Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

या भागामध्ये पाऊस जून ते नोव्हेंबरमध्ये पडतो. जूनमध्ये सरासरी पर्जन्यमान १७७.२ मिमी असते, जुलैमध्ये ३९४.४ मिमी, ऑगस्टमध्ये २७७.६ मिमी, सप्टेंबर २००.५ मिमी, ऑक्टोबरमध्ये ४९.६ मिमी आणि नोव्हेंबरमध्ये १३.३ मिमी असते. हवेचे सरासरी तापमान १५ - २७ ° से असते. मेमध्ये ४५ ° किंवा त्यापेक्षा जास्त तापमान आढळते तर डिसेंबर आणि जानेवारीमध्ये ८ - १० ° से इतके कमी तापमान असते. पावसाळ्यामध्ये कमाल तापमान ३१.८ ° से इतके असते तर हिवाळ्यामध्ये २९.३ ° से आणि उन्हाळ्यात ३७.० ° से असते. तर पावसाळ्यात किमान तापमान २३.६ ° से, हिवाळ्यात १६.४ ° से, आणि उन्हाळ्यात २२.५ ° से असते.
या विभागामध्ये २२.४ लाख जमीन आहे. एक हेक्टरपेक्षा कमी सीमावर्ती जमिनीचे प्रमाण २४.२०% आहे तर दोन हेक्टरांपेक्षा कमी जमिनीचे प्रमाण ३३.२% आहे (१९९०-९१ जमीनगणना). सरासरी जमीन-वापराचे प्रमाण २.३८ हेक्टर आहे. खरीप हंगामामध्ये लागवड केली जाणारी प्रमुख पिके म्हणजे कापूस, बाजरी, शेंगदाणा, सूर्यफूल, वाटाणा व करडई.
या विभागातील (पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षणाचा विभाग) वापराखालील जमिनीचा वाटा एकूण शेतजमिनींच्या ५७.६८% आहे. शेतक-यांद्वारा वापरली जाणारी जमीन राज्यामध्ये २११.०५ हेक्टर आहे. अवर्षण विभागातील जिल्ह्यांमध्ये वापरले जाणारे क्षेत्र राज्यातील क्षेत्राच्या प्रमाणाच्या ६०.१३% होते. अवर्षण विभागातील मालकीहक्काखालील सरासरी जमीन ३.८१ हे आहे जी राज्याच्या सरासरीपेक्षा किंचित जास्त आहे. राज्यातील तसेच अवर्षणाखालील बहुतेक सर्व जमीन ही एका मालकीहक्काखालील आहे. संयुक्त आणि संस्थात्मक मालकीच्या जमिनी एकूण जमिनीच्या २% होत्या.
या विभागामध्ये ५४.८६% इतक्या मोठ्या प्रमाणातील शेतजमीन २ हेक्टरांपर्यंत जमीन असणा-या लहान आणि सीमावर्ती शेतक-यांच्या मालकीची असून ती वापराखालील क्षेत्राच्या केवळ १७.०२% आहे. तर या विभागातील एकूण शेतजमिनीपैकी केवळ ३.६१% ही २.८५ हे पासून १.५५ हेक्टरदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात, ३.६८ हेक्टर धुळे जिल्ह्यात आहे तर राज्यामध्ये ३.१२ हेक्टर आहे.
१. कोकण प्रदेशामध्ये २००० ते ४००० मिमी इतका प्रचंड पाऊस पडतो, त्यापैकी ९०% पाऊस जून-ऑक्टोबरमध्ये (१००-११० )पडतो. २. संबंधित आर्द्रता खरीपामध्ये ९०-९५% आणि रब्बी हंगामामध्ये ८०-८५% इतकी असते. रत्नागिरी (३,७१३ मिमी) मध्ये सिंधुदुर्ग (३,५६४ मिमी) जिल्ह्यापेक्षा जास्त पाउस पडतो. ३. रत्नागिरीमध्ये सरासरी किमान, कमाल तापमान १९.९ – ३४.० से दरम्यान असते तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये २२.७ - ३१.२ से इतके असते. ४. तांदूळ महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशातील महत्त्वाचे धान्यपीक आहे. बहुसंख्य शेतकरी (८५%) सीमांत (< १ हेक्टर) आणि लहान (< २ हेक्टर) शेतकरी आहेत.
तांदूळ महाराष्ट्रातील अनेक प्रदेशांमध्ये पिकविला जातो. उदा.: १) दक्षिण कोकण किनारी प्रदेश २) पश्चिम महाराष्ट्र मैदानी प्रदेश ३) पश्चिम महाराष्ट्र अवर्षणाचा प्रदेश ४) मध्य महाराष्ट्र पठारी प्रदेश ५) विदर्भ

महाराष्ट्राचे कृषीपर्यावरणीय विभाग ( Agro ecological zones of Maharashtra)

राज्याचे खालील कृषीपर्यावरणीय विभाग पाडण्यात आलेले आहेत:

१. कृषीपर्यावरणीय विभाग 1: खूप जास्त पर्जन्यमान, लाल मृदा;

२. कृषीपर्यावरणीय विभाग 2: खूप जास्त पर्जन्यमान, लाल नसणारी मृदा;

३. कृषीपर्यावरणीय विभाग 3: घाट विभाग

४. कृषीपर्यावरणीय विभाग 4: स्थित्यंतर 1, लालकडून लालसर तपकिरी मृदेकडे

५. कृषीपर्यावरणीय विभाग 5: स्थित्यंतर 2, करडी काळी मृदा;

६. कृषीपर्यावरणीय विभाग 6: दुष्काळी विभाग

७. कृषीपर्यावरणीय विभाग 7: निश्चित पर्जन्यमान, मुख्यत्वे खरीप पीक

८. कृषीपर्यावरणीय विभाग 8: मध्यम ते जरा जास्त पर्जन्यमान, शोषक थरांपासून बनवेली मृदा (ट्रॅप सॉइल) असते;

९. कृषीपर्यावरणीय विभाग 9: जास्त पर्जन्यमान मिश्र खडकांमधून तयार झालेली मृदा. राज्यामध्ये काळी, लाल, रेगूर आणि गाळाची मृदा आढळते.

Copy rights | Disclaimer | RKMP Policies