Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

फोरेट 10ग्रॅम @ 10 किग्रॅ किंवा क्विनाल्फॉस 5ग्रॅम @ 15 किग्रॅ किंवा इथोप्रोफोस 5 ग्रॅम @ 15 किग्रॅ/हे. ह्या प्रमाणात, पुनर्लावणीनंतर 10 व 30 दिवसांनी, मातीतून देणे. 5 टक्के सिल्व्हर शूट्स /चौ.मी ईटीएल वर आधारित.
1. नव्याने जन्मलेली अळी मुळाचे टोक खाऊ लागते व ह्यामुळे तयार होणार्याऊ लांब नळीसारख्या रचनेला “गॉल” किंवा “सिल्व्हर शूट” म्हणतात. 2. ही एक दंडगोलाकार, पांढर्याे किंवा फिक्या हिरव्या रंगाची नळी असते आणि तिच्या टोकाला एक छोटेसे हिरवे पान असते. रोगग्रस्त फुटव्यांना कणसे धरत नाहीत. 3. फुलोरा येण्याच्या वेळी जास्तीतजास्त प्रादुर्भाव आढळतो. परंतु एकदा ओंब्या धरू लागल्यावर ही कीड जास्त नुकसान करीत नाही. 4. उशीरा लावलेल्या पिकाचे फार नुकसान होते. लवकर झालेला पाऊस आणि त्यानंतर कोरडी हवा राहिल्यास किडीचा फैलाव जास्त होतो.
1. किडीचे नाव - गॉल मिज 2. शास्त्रीय नाव - ऑर्सोलिया ऑरिझी 3. स्थानिक नाव - नळ आणि गड माशी 4. किडीची वैशिष्ट्ये - ही कीड फक्त खरीप हंगामातच आढळते आणि तिला 95 टक्यांवसपेक्षा जास्त तुलनात्मक आर्द्रता लागते. 5. प्रादुर्भावाची तीव्रता - मध्यम 6. पिकाच्या वाढीची स्थिती - रोपटी आणि फुलोरा
1. सुचवलेल्या कीटकनाशकांपैकी कोणत्याही एकाचा वापर करणे. प्रकाश-पिंजर्याणत सापडणार्याा पाकोळ्यांची वाढती संख्या किंवा 1 अंड्यांचा पुंजका (एग मास) किंवा 5 टक्के डेड-हार्टस् ईटीएल वर आधारित. 2. मध्यम उशीराने येणार्याै जातींसाठी दाणेदार कीटकनाशक एकदा मातीतून देणे किंवा पुनर्लावणीच्या दिवसापासून (DAT) 25 दिवसांनी, सात दिवसांच्या अंतराने, पानांवर दोन फवारण्या करणे. उशीराने येणार्याू जातींसाठी दाणेदार कीटकनाशक मातीतून दोनदा देणे किंवा पुनर्लावणीच्या दिवसापासून (DAT) 25 दिवसांनी, सात दिवसांच्या अंतराने, पानांवर चार फवारण्या करणे . 3. लावकर तयार होणार्यास जातींसाठी कीटकनाशकाची गरज नाही.
1. मातीमध्ये फोरेट 10ग्रॅम @ 10 किग्रॅ/हे. किंवा क्विनाल्फॉस 5ग्रॅ @ 15 किग्रॅ/ हे. किंवा कार्बोफ्युरॉन 3ग्रॅ @ 16.5 किग्रॅ/हे. लावणीनंतर 25 दिवसांनी देणे.एक अळी किंवा अंड्यांची संख्या /चौ. मी. ईटीएल वर आधारित 2). पानांवर 0.06 टक्के एंडोसल्फान किंवा 0.08 टक्के क्विनाल्फॉस किंवा 0.08 टक्के फेनिट्रोथिऑन फवारणे, ईटीएल वर आधारित.
1. भातपिकावरची ही प्रमुख कीड आहे आणि दुहेरी पीक घेतले जाणार्या् क्षेत्रामध्ये गंभीर स्वरूपाची असते. 2. ही अळी खोडाला भोक पाडून आतले अन्न शोषते आणि त्यामुळे मध्यवर्ती मूळच मरते. ह्याला डेड-हार्ट म्हणतात. 3. पीक पुनरुत्पादनाच्या टप्प्याला असताना किडीने हल्ला केल्यास अशांना पोकळ पांढरी कणसे धरतात (ह्यांना स्थानिक लोक पाळिंज म्हणतात). डेड-हार्टस आणि व्हाइट-इअर्स (पांढरी कणसे) ओढली की लगेच तुटून हातात येतात.
1. किडीचे नाव - यलो स्टेम बोअरर 2. शास्त्रीय नाव - सर्पोफागा इंसर्ट्युला 3. स्थानिक नाव - खोड किडा 4. किडीची वैशिष्ट्ये - वर्षभर केव्हाही आढळते 5. प्रादुर्भावाची तीव्रता - कमी ते गंभीर, 80.00 टक्क्यांपर्यंत 6. पिकाच्या वाढीचे टप्पे – वाढीचे सर्व टप्पे उदा. रोपटी, फुलोरा आणि फुटवा.
1. खतांचा योग्य वापर, रोगविरोधक जाती लावणे, बियांवर गरम पाण्याची प्रक्रिया करणे आणि दोन रोपांमध्ये पुरेशी जागा सोडल्यास ह्या रोगाचे व्यवस्थापन करता येते. 2. खाचरे स्वच्छ ठेवणे चांगले. काढणीनंतर राहिलेला काडीकचरा, गवत तसेच आपोआप उगवणारी रोपटी काढून टाका म्हणजे त्यांद्वारे, हंगामाच्या सुरुवातीलाच, रोग पसरणार नाही. 3. रोग आटोक्यात ठेवण्यासाठी पाण्याचा चांगला निचरा होणे – विशेषतः बी लावलेल्या वाफ्यांमध्ये - महत्त्वाचे आहे.
बॅक्टेरिअल लीफ स्ट्रीकचे दिसणारे पहिले लक्षण म्हणजे पानांच्या शिरांमध्ये पाण्याने भरल्यासारखे दिसणारे आखूड पट्टे उद्भवणे. नंतर त्यांची लांबी वाढून ते अर्धपारदर्शक व फिक्या तपकिरी किंवा पिवळसर तपकिरी रंगाचे बनतात. अशा अनेक पट्ट्यांमुळे पान कोरडे पडल्यासारखे दिसते. नंतरच्या काळात हा रोग बॅक्टेरिअल लीफ ब्लाइटपासून वेगळा ओळखता येत नाही. ह्या रेषा किंवा अरुंद पारदर्शक रेषा पान सूर्यप्रकाशाच्या विरुद्ध दिशेने पाहिल्यास दिसतात. अशा एखाद्या रेषेचे वाढणारे टोक कापून तो भाग पाण्याने भरलेल्या पेल्यात धरला असता जीवाणूंच्या पेशी पानातून बाहेर येताना दिसतात व त्यांमुळे 5 मिनिटांतच पाणी गढूळ रंगाचे बनते. पाने तपकिरी होऊन मरतात आणि डाग गडद तपकिरी किंवा करड्या रंगाचे बनतात व अखेरीस पूर्ण पान सुकते. गंभीर स्थितीमध्ये 1000 ग्रेन-वेट कमी होते.
1. कोणत्या जीवाणूंमुळे होतो : झांथोमोना ओरिझी पीव्ही. ओरिझिकोला 2. बॅक्टेरिअल लीफ स्ट्रीक हा आजार साधारणपणे भातपिकाला फुटवे येण्याच्या काळात दिसतो. 3. नंतरच्या वाढीदरम्यान भातपीक ह्या हल्ल्यामधून सावरते आणि उत्पादनावर फारसा परिणाम होत नाही. 4. परंतु 1000 ग्रेन-वेटच्या संदर्भात पाहता BLS मुळे 32.3% पर्यंत नुकसान झाल्याचीही नोंद आहे.
Copy rights | Disclaimer | RKMP Policies