Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

1. रोगमुक्त झाडापासून मिळालेलेच बी पेरणीसाठी वापरा.

2. हे बियाणे प्रथम 12 तास स्ट्रेप्टोसायक्लिन(0.15%) आणि द्रवणयोग्य सेरेसान (0.05%) च्या मिश्रणात भिजवा आणि त्यानंतर 30 मिनिटे त्यावर गरम पाण्यची प्रक्रिया करा (52oसे-54oसे).

3. रोग-व्यवस्थापनाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रोगविरोधक वाण लावणे. व्यापारी तत्त्वावर लावल्या जाणार्यास काही रोगविरोधक वाणांची नावे अशी – सुवर्णा, IR 36, IR 64 आणि साकेत

4, IR-20, IR-54, आशा आणि दया. 4. अनुकूल हवा टिकून राहिली आणि रोगाचे प्रमाणही वाढते राहिले तर नत्रयुक्त खते देणे थांबवलेले चांगले म्हणजे रोगाचा प्रभाव कमी होईल.

5. तांब्यावर आधारित बुरशीनाशकांची फवारणी करा – उदा. ब्लायटॉक्स 50 व अशीच इतर.

6. स्ट्रेप्टोसायक्लिन @ .6% ची फवारणी.

7. खाचरांमधील पाणी वारंवार काढत राहणे.

ह्या जीवाणूमुळे एकतर रोपे सुकतात किंवा त्यांची पाने खराब होतात. 'क्रेसेक' प्रकारचे सुकणे अधूनमधून शेतांत आढळते व ह्यामुळे फार नुकसान होते. रोपांच्या पुनर्लावणीनंतर 3-4 आठवड्यांत हे लक्षण हमखास आढळते. क्रेसेकमुळे एकतर पूर्ण रोपच मरते किंवा काही पानांवर परिणाम होतो. फुटवे येण्यापासून हेडिंगच्या काळामध्ये पानांवर डाग पडणे हे लक्षण मोठ्या प्रमाणात दिसते. जरा कमी आढळणारे तिसरे लक्षण म्हणजे किंवा कडांना फिक्या हिरव्या रंगाचे पाणीयुक्त किंवा पिवळे ठिपके उठणे. हे ठिपके 5-10 मिमी लांबीचे असतात. ह्यामुळे पाने टोकाकडून किंवाकडेने मरू लागतात. हा रोग नंतर पानाच्या एका किंवा दोन्ही कडांनी पसरत पर्णकोशापर्यंत पोहोचतो. रोगाच्या पुढच्या पायरीला बरेचसे ठिपके एकत्र होऊन त्यांचे पिवळसर रंगाचे मोठे डाग बनतात. पानावरील ह्या रोगट डागाची जी कड शेजारील हिरव्या भागाच्य
1. कोणत्या जीवाणूंमुळे होतो: झांथोमोना कॉँपेस्ट्रिस पीव्ही. ओरिझी. 2. बॅक्टेरिअल ब्लाइट हा रोग पावसाळ्यात दिसतो. त्याची सुरूवात आणि तीव्रता मुख्यतः पावसाचे प्रमाण, पाऊस पडल्याचे एकूण दिवस, नत्रयुक्त खतांची मात्रा, बियाण्याची जात इ. वरच अवलंबून असते. 3. गंभीर स्वरूपाचा फैलाव 1979 तसेच 1980 मध्ये वायव्य भारतात आढळला होता व त्यामुळे उत्पादन खूपच घसरले होते.
1. काढणीनंतर पिकाचे बुडखे काढून नष्ट करा. लावणी करताना रोपांमध्ये पुरेसे अंतर ठेवा. 2. फुटवे येण्याच्या काळात पालाश (पोटॅश) ची मात्रा द्या. कॅल्शिअम सल्फेट आणि झिंक सल्फेटचा फवारा पानांवर मारल्याने हा रोग आटोक्यात राहतो. 3. बूटिंगच्या काळात बियाण्यावर कार्बेंडाझिम किंवा मॅन्कोझेबची प्रक्रिया केल्याने किंवा पानावर ह्याची फवारणी केल्याने रोग आटोक्यात राहतो. बेनोमिल आणि कॉपर ऑक्सिक्लोराइडचा फवारा पानांवर मारल्यानेही चांगला परिणाम दिसतो.
1. नवीन फुटवे असणार्याे सर्वांत वरच्या पर्णकोशावर रोगाचा परिणाम, काही कालावधीनंतर (लेट बूटिंग स्टेज) होतो. 2. सर्वप्रथम लंबगोलाकार किंवा वेडेवाकडे ठिपके किंवा डाग आढळतात. हे सुमारे 0.5-1.5 सेंमी लांब असतात. त्यांचा मध्यभाग करड्या रंगाचा तर कड गडद लालसर-तपकिरी रंगाची असते. 3. पर्णकोशामध्ये रंग उडालेले लालसर तपकिरी डागही असू शकतात. 4. हे डाग आकाराने वाढत जातात आणि ते एकत्र येऊन संपूर्ण पानावर पसरतात. 5. रोगाच्या गंभीर स्थितीमध्ये नवीन फुटवे संपूर्णपणे किंवा काही प्रमाणात पर्णकोशातच राहतात. 6. पर्णकोशातून बाहेर न आलेले फुटवे कुजून लालसर-तपकिरी किंवा गडद तपकिरी रंगाचे बनतात. 7. रोगग्रस्त पर्णकोशांत तसेच नवीन फुटव्यांत पांढुरकी पावडर मोठ्या प्रमाणात आढळते. 8. रोगग्रस्त फुटवे फिके असतात, त्यांचा रंग उडतो. त्यांची पुनरुत्पादनाची क्षमता नसते. ती सुरकुततात आणि
ह्या रोगामुळे ओरिझा सॅटिव्हा L ला आसरा मिळतो. इतर वनस्पती म्हणजे मका, मोतिया बाजरी, ज्वारी, एचिनोक्लोआ कलोना (L.) लिंक (जंगली गवत), एल्युझिन इंडिका (L.) गर्डन. (गूज-ग्रास), लेप्टोक्लोआ चिनेसिस (L.) नीस (रेड स्प्रँगलटॉप), ओरिझा रफिपोगन (लाल भात) आणि झिझेनिया ऍक्वाटिका (वार्षिक जंगली भात).
नत्राचे जास्त प्रमाण, जास्त तुलनात्मक आर्द्रता, दाटीवाटीने जोमदार वाढलेले पीक ह्यांमुळे शीथ रॉट रोग पसरतो. ही बुरशी 20 ते 28°से दरम्यान जास्त वाढते.
भाताच्या पिकाची वाढ पूर्ण होण्याच्या दिवसांत हा रोग महत्त्वाचा ठरतो. ह्यामध्ये साधारणतः सर्वांत वरच्या पर्णकोशावर रोगाचा हल्ला होतो. ह्यामध्येच ओंबी असल्याने तिचे नुकसान होते.
24
Aug

शीथ रॉट रोग ( Sheath rot disease)

1. कोणत्या जीवाणूमुळे होतो: सारोक्लाडिअम ओरिझी (सावदा) डब्ल्यू गॅम्स आणि डी हॉकस्क
• पेरणीसाठी रोगमुक्त बियाणे वापरा. • बियाण्यावर गरम पाण्याची प्रक्रिया करा - 52°से, 10 मिनिटांसाठी. • शेतातील रोगग्रस्त ओंब्या नष्ट करा. • बियाण्यावर कार्बेंडाझिम 2.0ग्रॅम/किग्रॅ ची प्रक्रिया करा.
Copy rights | Disclaimer | RKMP Policies