Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

• एका ओंबीमध्ये ह्या रोगाची लक्षणे दाखवणारे थोडेसेच दाणे असतात. • ओंबीतील प्रत्येक दाण्याचे रूपांतर मखमली पिवळ्या किंवा हिरवट बीजकण-पिशवीमध्ये (स्पोर-बॉल्स) होते. • अशा पिशव्यांत व्हाइट मायसेलिअम आणि कोनिडिया प्रकारचे बीजकण आढळतात.
• कमी तापमान (20°से) • जास्त तुलनात्मक आर्द्रता (>92%) • मध्यम प्रमाणात पाऊस, फुलोरा धरताना अधूनमधून हलका पाऊस व स्वच्छ हवा. • पिकाच्या चांगल्या वाढीच्या व जास्त उत्पादनाच्या हंगामामध्ये हा रोग जास्त आढळतो. • कोणत्या वनस्पतींवर वाढतो: गवत आणि जंगली भात
24
Aug

फॉल्स स्मट रोग ( False Smut disease)

कोणत्या जीवाणूमुळे होतो: उस्तिलाजिनोआयडिया व्हायरेंस (सेke.) ताकाहाशी स्थानिक नाव: फॉल्स स्मट हा एक बुरशीजन्य रोग आहे. जास्त पाऊस पडणार्यां वर्षांमध्ये त्याचे स्वरूप जास्त गंभीर बनते. परंतु त्यामुळेच शेतकरी हे चांगल्या हंगामाचे लक्षण मानतात. उद्भवाचा काळ : ओंब्या दिसू लागणे उत्पादनाचे नुकसान : अत्यंत कमी, उदा. उडुपी जिल्ह्यात 23% आणि DWR मध्ये 3% • 1000 ग्रेन-वेट 48% ने • फोलपटे 40% ने • रोपाची वाढ • उगवण 25% ने
खाचरांमध्ये हा रोग आढळल्यास 0.1% कार्बेंडाझिम द्रावण किंवा 2ग्रॅम मॅन्कोझेब किंवा 2.25ग्रॅम झायनेब 1लिटर पाण्यात मिसळून फवारा.
• पेरणीसाठी रोगमुक्त बियाणे वापरा. • जास्त नत्रयुक्त खताचा वापर टाळा
1. पानाच्या टोकापासून तसेच कडांपासून सुरू होणारे फिक्या गहूवर्णी तसेच गडद तपकिरी रंगाचे डाग. 2. पूर्ण वाढीच्या पानांवरचे हे डाग लांबट आकाराचे असतात व त्यांचेभोवती फिक्या तपकिरी रंगाची प्रभावळ असते. 3. प्रत्येक डाग सुमारे 1-5 सेंमी लांब आणि 0.5-1 सेंमी रुंद असतो किंवा तो संपूर्ण पानावरही पसरलेला असू शकतो 4. हे डाग सतत वाढत गेल्याने पानाचा एकंदरीने बराच भाग प्रभावित होतो 5. बाधित भाग कोरडा पडतो व त्यामुळे पान जळाल्याप्रमाणे दिसते 6. पानाचे टोक व कडा अर्धपारदर्शक बनतात
24
Aug

लीफ स्काल्ड रोग ( Leaf Scald disease)

1. कोणत्या जीवाणूंमुळे होतो : मोनोग्राफेला अल्बेसिन्स. 2. उद्भवण्याचा काळ: फुटवे येत असताना तसेच खोडाची लांबी वाढत असताना. 3. उत्पादनाचे नुकसान: भारतात ह्या रोगामुळे उत्पादनाचे 20-30% नुकसान होत असल्याचे आढळते. 4. पूरक जीवाणू: ही बुरशी ह्या जीवाणूंमुळेही पसरते – एचिनोक्लोआ क्रस-गलि (L.) पी. बीव्ह्. (कॉक्सपर) तसेच ओरिझा सॅटिव्हा लि. (तांदूळ). 5. फैलावाचे मार्ग - 6. उद्भवाचे स्रोत: बियाणे आणि पूर्वीच्या पिकाची खोडे.0
• खाचरांमध्ये हा रोग आढळल्यास 2ग्रॅम मॅन्कोझेब किंवा 2.25ग्रॅम झायनेब 1लिटर पाण्यात मिसळून फवारा.
1. पेरणीसाठी रोगमुक्त बियाण्याचाच वापर करा. 2. जास्त नत्रयुक्त खतांचा वापर टाळा. 3. रोगाला विरोध करू शकणारी जात लावा – उदा. अमृत.
1. ह्या रोगाची लक्षणे कोलिओप्टाइल, पाने, पर्णकोष आणि ग्लुम्सवरही दिसतात. 2. पानांवरील डागांच्या आकारात फरक असू शकतो (1सेमी). ते छोट्या ठिपक्यापासून गोलाकार डागांपर्यंत, डोळ्याच्या आकाराचे किंवा मध्यभागी लंबगोलाकार डाग असलेलेही असू शकतात. 3. कधीकधी बियाणे सुरकुतलेले आणि रंग उडालेले असू शकते.
Copy rights | Disclaimer | RKMP Policies