Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

उद्भवण्याचा काळ: रोपट्यांपासून पूर्ण वाढलेल्या पिकापर्यंत उत्पादनाचे नुकसान: अतिगंभीर प्रकरणांत 50-90% पूरक जीवाणू (सेollateral hosts): डिजिटॅरिया सँग्विलॅनिस लीरसिया हेक्झांड्रा, एचिनोक्ला कलोना, पेनिसेटम टायफॉइडस,सेटारिया इटॅलिका, सिनॅडॉन डेक्टिलॉन. जीवाणूच्या वाढीसाठी योग्य परिस्थिती • तापमान 25-30°से • तुलनात्मक आर्द्रता (>90%) • जोरदार व उशीरा होणारा ईशान्य मोसमी पाऊस • दिवसा ढगाळ हवा • नत्राची जास्त मात्रा फैलावाचे मार्ग: वारा रोगाच्या उद्भवाचे स्रोत: बियाणे, पूरक जीवाणू, भातपिकाचे गवत किंवा राहिलेले खुंट
24
Aug

ब्राउन लीफ स्पॉट - Brown leaf spot

1. कोणत्या जीवाणूमुळे होतो: हेल्मिंथोस्पोरियम ओरिझी 2. स्थानिक नाव: 3. ब्राउन स्पॉट उर्फ तपकिरी डाग हा एक बुरशीजन्य रोग असून त्याचा परिणाम रोपटी आणि पूर्ण वाढीच्या झाडांवरही होतो. खाचरांचे योग्य व्यवस्थापन नसलेल्या ठिकाणी हा रोग जास्त गंभीर स्वरूपात दिसून येतो. 1942 साली बंगालमध्ये पडलेल्या भयानक दुष्काळाचे हे प्रमुख कारण होते. तेव्हा ह्या रोगाने 50-90% पिकाची हानी झाली होती आणि 20 लाख लोक मृत्युमुखी पडले होते. त्यानंतरच्या साथीच्या रोगांमुळे HYV'चे 14 ते 41% नुकसान झाले होते. साधारणतः पोषणमूल्ये कमी असलेल्या आणि कमी कसदार जमिनींवर हा रोग आढळत असल्याने त्यास गरिबाचा रोग (Poor man's disease) म्हणतात.
• बुरशीनाशकांची फवारणी – 1 लिटर पाण्यात 1ग्रॅम कार्बेंडाझिम 50WP (540ग्रॅम/एकर) किंवा 2.0 ग्रॅम मॅन्कोझेब 75WP किंवा 1मिलि हेक्झाकॉँझोल मिसळणे.
• रोगग्रस्त बियाणे वापरू नका. • नत्राचे ('N') प्रमाण मध्यम ठेवा (80-100 किग्रॅ/हे). खत 3-4 वेळा विभागून द्या. • जास्त 'N' देणे टाळा, रोगग्रस्त खाचरांमध्ये 'N' ची अखेरची मात्रा देऊ नका. • कचरा / तण इ. नष्ट करा. • तपकिरी तुडतुड्यांची संख्या आटोक्यात ठेवा
1. पर्णकोशावर एक किंवा एकाहून जास्त वाजवीपेक्षा मोठे, लांबट किंवा वेडेवाकडे लांबट डाग (चट्टे) आढळणे. रोगाच्या पुढच्या अवस्थेत डागाच्या मध्यभागी जांभळी-तपकिरी बाह्यरेखा असलेला फिका डाग उद्भवतो. 2. हे डाग सुरूवातीला पांढरे असतात परंतु नंतर गडद तपकिरी रंगाचे बनतात. 3. गंभीर स्थितीमध्ये पाने वाळू लागतात.
आढळण्याचा काळ: ओंब्यांपासून दाणा दुधी होईपर्यंत उत्पादनाचे नुकसान: वार्षिक सरासरी 20 ते 50% इतर बाधित पिके: हाती असलेल्या माहितीनुसार ऊस, घेवडा, सोयाबीन, टोमॅटो, वांगी, तंबाखू, शिंगाडा (वॉटर हायसिंथ) , hyaसेinth bean आणि हिरवे मूग ह्या पिकांवरही हा रोग वाढू शकतो (अल्टरनेट होस्ट) रोग वाढण्यासाठी योग्य परिस्थिती: जास्त तापमान (28-32°से), जास्त तुलनात्मक आर्द्रता (>96%), वारंवार पाऊस, नत्र-खतांचे जास्त प्रमाण आणि रोपे जवळजवळ लावणे फैलावाचे मार्ग: बियाणे, माती, वारा, पाणी. रोगाच्या उद्भवाचे स्रोत: गेल्या वर्षीचे पीक आणि तण ह्यांद्वारे जमिनीत राहिलेले रोगट भाग, पिकाच्या कचर्यारमधील मायसेलिअम.
1. कोणत्या जीवाणूमुळे होतो: रायझोक्टोनिया सोलानी कुम 2. मराठी नाव: पानकरपा 3. शीथ ब्लाइट हा बुरशीजन्य रोग आहे, कटिबंधीय प्रदेशांत, कोरड्या मोसमाच्या तुलनेने, पावसाळ्यात तो जास्त प्रमाणात आढळतो. 4. जेथे जलसिंचनाची चांगली सोय आहे अशा ठिकाणी हा रोग जास्त आढळतो. 5. पर्णकोश नष्ट होत असल्याने ह्याला शीथ ब्लाइट असे म्हणतात..
खूप दिवस पाऊस पडल्यानंतर किंवा वारा पडलेला असताना आर्द्रता जास्त झाल्यास किंवा वारा पडलेला असून रात्री गरम असताना (63-73°फॅ किंवा 18-23°से) हा रोग जास्त फैलावतो. कारण अशा वातावरणात बीजकणांची निर्मिती आणि वाढ चटकन होते. खाचरे सतत पाण्याने भरलेली ठेवल्याने आणि गार वार्याापासून पिकाचा बचाव केल्यास ही बुरशी आटोक्यात राहते.
संर्धनात्मक क्रियांमध्ये रोगट पीक पूर्णपणे नष्ट करणे, नत्रयुक्त खते जपून वापरणे (जास्त नत्रामुळे हा रोग वाढतो), ड्रिल पद्धतीपेक्षा वॉटर पद्धतीने रोपे बनवणे, खाचरे सतत पाण्याने भरलेली ठेवणे इ. चा समावेश होतो. तसेच रोगाला विरोध करणार्याक जाती लावाव्या. रासायनिक उपाय: बियाण्यावर लावणीपूर्वी थायरम @ 3 ग्रॅम/किग्रॅ आणि पायरोफ्यूरॉन @ 4 ग्रॅम/किग्रॅ ची प्रक्रिया करावी. रोग आढळल्याबरोबर दर लिटरी 1 मिली. एडिफॉन्फॉस किंवा 1 ग्रॅम कार्बेंडॅझिमची प्रक्रिया करण्याची शिफारस केली जाते.
सर्वप्रथम पानांवर तसेच खोडावर लंबगोलाकार करडे-पांढरे डाग उद्भवतात आणि पानाच्या कडा लालसर होतात (करपणे). हे डाग पाने किंवा खोडाच्या लांबीला समांतर असतात. रोपाला जेथे ओंबी फुटणार असते त्या ठिकाणी रोग पोहोचला की सर्वाधिक नुकसानीला सुरूवात होते कारण ओंबीची मानच मोडल्याने ती तुटून पडते (रॉटन नेक). तसेच ह्या रोगामुळे दाणा भरण्याची क्रिया होऊच शकत नाही (पॅनिकल ब्लास्ट). अनेकदा पिकाचे नुकसान 50% पर्यंतही पोहोचू शकते..
Copy rights | Disclaimer | RKMP Policies