Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

1. जास्त उत्पादन मिळवण्यासाठी एकात्मिक पोषकद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा वापर गरजेचा असतो. ह्यामागील तत्त्व असे सांगते की फुटवे येण्याच्या काळातच जास्तीतजास्त खत दिले गेले पाहिजे (70–80%) तर ह्यानंतरच्या टप्प्यावर अगदी थोडे खत द्यावे. 2. खाचरांत पाणी भरण्यापूर्वी 10 tटन/हे शेतातील खत द्यावे. ऐंद्रीय N, P & K च्या जोडीला, नांगरणीपूर्वी किंवा पाणी भरण्यापूर्वी, सेंद्रीय खत (10–15 टन/हे – ताज्या खताचे वजन) दिल्यास फायदा होतो. 3. संशोधनातून दिसले आहे की भाताचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी हेक्टरी 100:50:50 किग्रॅ N:P:K हे योग्य प्रमाण आहे. खटप्प्यांत द्या (40% बेसल, 40% फुटव्यांचेवेळी आणि 20% ओंबी बाहेर योताना) तर हेक्टरी स्फुरदाची पूर्ण मात्रा (300 किग्रॅ SSP) तसेच पालाशची पूर्ण मात्रा(85 किग्रॅ MOP) द्यावी . किंवा ग्लिरिसिडियाची पाने @ 10 t/हे ह्या प्रमाणात वापरल्याने (5 टन दुसर्याप नांगरणीच्या वेळ
1. पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन होण्यासाठी शेत सपाट असावे. 2. पुनर्लावणीपासून शेतात 1–2 सेंमी उंचीचे पाणी भरा. रोपटी व्यवस्थित जगेपर्यंत एवढे पाणी ठेवा (सुमारे 10 दिवसांपर्यंत). त्यानंतर फुटवे येण्यासाठी पाण्याची ही पातळी वाढवून 2–3 सेंमी करा. 3. जास्तीतजास्त फुटवे आल्यानंतर, पाणी काढून टाका म्हणजे अनुत्पादक फुटवे येणार नाहीत आणि रोपांची वाढ एकसमान होईल. 4. हेडिंग तसेच फुलोरा धरण्याच्या काळात 10 सेंमी खोल पाणी ठेवा. दुधाच्या दाण्यांचा टप्पा पूर्ण होईपर्यंत 5 सेंमी पर्यंत पाणी कायम ठेवा. 5. काढणीआधी 10- 15 दिवस शेतातील पाणी काढून टाका.
11
Aug

पुनर्लावणी ( Transplanting)

1. 1000 मिमी पेक्षा कमी वार्षिक पाऊस असलेल्या भागांत ह्या पद्धतीचा वापर करावा – उदा. कोकण आणि विदर्भ 2. 35-40 किग्रॅ /हे बियाणे लागते. हायब्रीड जातींसाठी हेक्टरी 20 किग्रॅ बियाणे पुरते. एक हेक्टरावरील पुनर्लावणीसाठी 1000 चौ. मी. क्षेत्राची रोपवाटिका पुरेशी असते. 3. वर सांगितल्याप्रमाणे रोपवाटिका चालवावी. खरीप हंगामात 12 to 15 सेंमी उंचीची, 5-6 पाने असलेली आणि 21-25 दिवस वयाची रोपे पुनर्लावणीसाठी वापरा. 3. रब्बी हंगामात 35- 40 दिवस वयाची रोपे पुनर्लावणीसाठी वापरा. रोपांतील अंतर 15 x 15 किंवा 20 x 15 सेंमी असावे. एका वरंब्यावर 2-3 रोपटी लावा. हायब्रीड बियाणे असल्यास रोपांतील अंतर 20 x 20 ठेवून एका वरंब्यावर एकच रोप लावा.
11
Aug

भाताची थेट पेरणी ( Direct seeding of rice)

1. 1000 मिमी पेक्षा कमी वार्षिक पाऊस असलेल्या भागांत ह्या पद्धतीचा वापर करावा. 2. महाराष्ट्राच्या काही अपारंपारिक भागांत ही पद्धत वापरतात – उदा. मराठवाडा, प. महाराष्ट्र 3. ह्या पद्धतीमध्ये हेक्टरी 80-100 किग्रॅ बियाणे लागते. पेरणीपूर्वी 24 तास बियाण्यावर थायरॅमची प्रक्रिया @ 2 ग्रॅम/किग्रॅ बियाणे ह्या प्रमाणात करा म्हणजे बियाणे तसेच मातीतून पसरणार्या रोगांना अटकाव होईल.
1. बियाण्याची गुणसूत्रात्मक (जेनेटिक) तसेच जातीची शुद्धता असावी, त्यामध्ये वाणांची मिसळ येऊ नये. पिकाचा वाण आणि कालावधी स्थानिक कृषिपद्धतींशी सुसंगत असावा. 2. बियाणे शुद्ध, चांगल्या वाढीचे आणि भरपूर उत्पादन देणारे असावे. 3. बियाणे अंतर्गत रोग आणि किडींच्या संसर्गांपासून मुक्त असावे. 4. बियाणे स्वच्छ असावे; त्यासोबत तणाचे बी किंवा इतर वस्तू नसाव्या. 5. बियाणे पूर्ण स्वरूपात असावे – म्हणजे तुकडे किंवा नुकसान झालेले नको. 6. बियाण्यात योग्य प्रमाणात आर्द्रता असली पाहिजे (8-12 %). 8. बियाण्याच्या उगवणीची टक्केवारी चांगली असावी (80 % पेक्षा जास्त) 9. पेरल्यानंतर बियाणे लवकर व एकसारखे उगवले पाहिजे.
11
Aug

बियाण्याचा दर्जा ( Seed quality)

चांगल्या दर्जाचे बियाणे वापरल्याचे फायदे असे - 1. उगवण एकसारखी असते त्यामुळे न उगवलेल्या बियांच्या जागी पुनः पेरणी करावी लागत नाही. 2. रोपट्यांची जोमदार वाढहोत असल्याने त्यांना तण व रोगापासून कमी त्रास होतो. 3. वाढ, परिपक्वता आणि उत्पादनाच्या पातळ्यांमध्ये एकसमानता. 4. साठवणुकीदरम्यानही दर्जा कायम राहतो. 5. स्वच्छ करणे, मानकीकरण (स्टँडर्डायझेशन) आणि निर्जंतुकीकरणास कमी खर्च. 6. एकंदर खर्च कमी होतो.

डॅपोग पद्धतीची रोपवाटिका म्हणजे कॉँक्रीटच्या जमिनीवर किंवा पॉलिइथिलीनच्या शीटने झाकलेल्या मातीच्या गादीवाफ्यावर रोपे वाढवणे. जेथे पाण्य्चा खात्रीशीर सोय असेल अशा ठिकाणी ही पद्धत वापरतात.

1. बियाण्याचा वापर: 25-35 किग्रॅ/हे

2. बियाण्यावर प्रक्रिया: कोरड्या बियाण्यावर प्रक्रिया: बियाण्यावर बुरशीनाशकांची – उदा. बॅव्हिस्टिन किंवा थायरॅम 2 ग्रॅम/किग्रॅ बियाणे ह्या प्रमाणात, पेरणीआधी 24 तास, प्रक्रिया करा. त्यानंतर बियाण्यावर ऍझोस्पिरिलम (600 ग्रॅम प्रति हे ह्या प्रमाणात) ची प्रक्रिया करा.

3. ओल्या बियाण्यावर प्रक्रिया: बियाण्यावर कार्बेंडाझिम किंवा पायरोक्विलॉन किंवा ट्रायसायडोझोल प्रतिलिटर पाण्यामध्ये 2 ग्रॅम (1 किग्रॅ बियाण्यासाठी) प्रमाणे मिसळून प्रक्रिया करा. बियाणे ह्या द्रावणात 2 तास भिजवून ठेवा. द्रावण काढून टाका, बियाण्याला मोड आणा व

11
Aug

ओली रोपवाटिका ( Wet Nursery)

1. बियाण्याचे प्रमाण: 50-60 किग्रॅ/हे भरड दाण्यांसाठी, 35- 40 किग्रॅ/हे पातळ दाण्यांसाठी and 20 किग्रॅ/हे हायब्रीडसाठी. 2. बियाण्यावर प्रक्रिया: कोरड्या बियाण्यावर प्रक्रिया: बियाण्यावर बुरशीनाशकांची – उदा. बॅव्हिस्टिन किंवा थायरॅम 2 ग्रॅम/किग्रॅ बियाणे ह्या प्रमाणात, पेरणीआधी 24 तास, प्रक्रिया करा. त्यानंतर बियाण्यावर ऍझोस्पिरिलम (600 ग्रॅम प्रति हे ह्या प्रमाणात) ची प्रक्रिया करा. 3. ओल्या बियाण्यावर प्रक्रिया: बियाण्यावर कार्बेंडाझिम किंवा पायरोक्विलॉन किंवा ट्रायसायडोझोल प्रतिलिटर पाण्यामध्ये 2 ग्रॅम (1 किग्रॅ बियाण्यासाठी) प्रमाणे मिसळून प्रक्रिया करा. बियाणे ह्या द्रावणात 2 तास भिजवून ठेवा. द्रावण काढून टाका, बियाण्याला मोड आणा व ते वाफ्यात लावा. ह्याने बियाण्याला, रोपटे बनण्याच्या कालावधीत, ब्लास्टसारख्या रोगांपासून 40 दिवांपर्यंत संरक्षण मिळते. 4. रोपवा
11
Aug

कोरडी रोपवाटिका ( Dry Nursery)

1. बियाण्याचे प्रमाण: 50-60 किग्रॅ/हे (भरड दाण्यासाठी) 35- 40 किग्रॅ/हे (पातळ दाण्यासाठी) आणि 20 किग्रॅ/हे (हायब्रीडसाठी). 2. बियाण्यावर प्रक्रिया: बियाण्यावर बुरशीनाशकाची प्रक्रिया केली जाते – उदा. बॅविस्टिन किंवा थायरॅम, 2 ग्रॅम/किग्रॅ बियाणे ह्या प्रमाणात, पेरणीआधी 24 तास. ह्यानंतर बियाण्यावर, 600 ग्रॅम प्रति हे ह्या प्रमाणात, ऍझोस्पिरिलिअमची प्रक्रिया करतात. 3. रोपवाटिकेतील वाफा बनवणे: 120 सेंमी रुंद, 15 सेंमी उंच आणि सोयीस्कर लांबीचे गादीवाफे बनवा.त्यांच्याभोवती अर्धा मीटर रुंदीची नाली बनवा ज्यायोगे जादा पाणी वाहून जाईल. 4. पेरणी: प्रक्रिया केलेले बियाणे वाफ्यात एकसारखे लावा.. 5. पाणी देणे: कोरड्या रोपवाटिकेला 2 किंवा 3 दिवसांनी एकदा, मातीच्या पोतानुसार, पाणी द्या. 6. खतांचे व्यवस्थापन: 10 m लांबी आणि 1.5 मी रुंद रोपवाटिकेसाठी 30 किग्रॅ खत (शेतावरील – फार्मयार्ड मॅन्युअर किं
भाताच्या रोपवाटिकेचे विविध प्रकार: 1. कोरडी रोपवाटिका. 2. ओली रोपवाटिका. 3. डॅपॉग पद्धतीची रोपवाटिका.
Copy rights | Disclaimer | RKMP Policies