Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

03
Jul

कोरडी रोपवाटिका

1. बियाण्याचे प्रमाण: 50-60 किग्रॅ/हे (भरड दाण्यासाठी) 35- 40 किग्रॅ/हे (पातळ दाण्यासाठी) आणि 20 किग्रॅ/हे (हायब्रीडसाठी). 2. बियाण्यावर प्रक्रिया: बियाण्यावर बुरशीनाशकाची प्रक्रिया केली जाते – उदा. बॅविस्टिन किंवा थायरॅम, 2 ग्रॅम/किग्रॅ बियाणे ह्या प्रमाणात, पेरणीआधी 24 तास. ह्यानंतर बियाण्यावर, 600 ग्रॅम प्रति हे ह्या प्रमाणात, ऍझोस्पिरिलिअमची प्रक्रिया करतात. 3. रोपवाटिकेतील वाफा बनवणे: 120 सेंमी रुंद, 15 सेंमी उंच आणि सोयीस्कर लांबीचे गादीवाफे बनवा.त्यांच्याभोवती अर्धा मीटर रुंदीची नाली बनवा ज्यायोगे जादा पाणी वाहून जाईल. 4. पेरणी: प्रक्रिया केलेले बियाणे वाफ्यात एकसारखे लावा.. 5. पाणी देणे: कोरड्या रोपवाटिकेला 2 किंवा 3 दिवसांनी एकदा, मातीच्या पोतानुसार, पाणी द्या. 6. खतांचे व्यवस्थापन: 10 m लांबी आणि 1.5 मी रुंद रोपवाटिकेसाठी 30 किग्रॅ खत (शेतावरील – फार्मयार्ड मॅन्युअर किं
03
Jul

रोपवाटिका व्यवस्थापन

भाताच्या रोपवाटिकेचे विविध प्रकार: 1. कोरडी रोपवाटिका. 2. ओली रोपवाटिका. 3. डॅपॉग पद्धतीची रोपवाटिका.
दुचाकी ट्रॅक्टरचे फायदे: 1. बहुपयोगी 2. प्राणी किंवा माणसे करू शकतील त्यापेक्षा कठीण परिस्थितीत काम करू शकतो 3. ओल्या तसेच कोरड्या स्थितीत कामे करू शकतो 4. रचना सरळ-सोपी असते तोटे: 1. खरेदीचा आणि वापरण्याचा खर्च 2. चालकाला कष्ट होतात परंतु आता त्यावर बसण्याजोगी मॉडेल्स मिळू लागली आहेत.
i) पाळीव प्राणी: जमीन तयार करणे, तणाचे व्यवस्थापन, पिकाची उफणणी तसेच ओझी वाहून नेणे ह्या सर्व कामांसाठी प्राणिज ऊर्जा उपयोगी पडते. महाराष्ट्रात शेतीची कामे करण्यासाठी रेडे किंवा बैल सर्वाधिक संख्येने वापरले जातात. ii) माणसे: जमीन तयार करण्यामधली अनेक कामे मानवी ऊर्जा वापरून केली जातात – उदा. नांगरणी, जमीन सारखी करणे, बंधारे आणि नाल्या बांधणे, झाडे लावणे, किडीचे नियंत्रण, पिकाची काढणी, धान्यावर प्रक्रिया करणे इ iii) दुचाकी ट्रॅक्टर: जमीन तयार करण्यासाठी दुचाकी ट्रॅक्टर वापरले जातात. ह्यामध्ये नांगरणी, जमीन एका पातळीला आणणे, पाणी उपसणे आणि वाहतुकीचा समावेश दंताळी आणि रोटाव्हेटर्स iv) चारचाकी ट्रॅक्टर: अशा ट्रॅक्टरचा पॉवर-टु-वेट रेशो म्हणजे स्वतःच्या वजनाच्या तुलनेत काम करण्याचे प्रमाण चांगले असते – नांगराच्या दांड्यावर प्रत्यक्ष 55-60% शक्ती मिळू शकते.. भात
03
Jul

पाणथळ जमिनी

1. पाणथळ जमिनींसाठी वापरण्याच्या पद्धतीनुसार, भात लावण्यासाठी, खाचरांत मानवी तसेच यांत्रिक उपायांनी पाणी भरून ठेवले जाते. 2. खाचर काळ्या चिकण मातीचे असल्यास अशा पाण्याची पातळी सुमारे 15-20 सेंमी ठेवली जाते. 3. चांगल्या रीतीने पाणी भरले गेल्यास अशी जमीन अतिशय मऊ, तणरहित, एकसमान पातळीची असते आणि तिच्यात पाणी कमी मुरते. पाणथळ जमिनीसाठी वापरण्याची औजारे i) देशी नांगर ii) बोस नांगर iii) पाणथळ जमिनीत पाणी भरण्याचे उपकरण (वेटलँड पडलर) iv) केज व्हील v) सर्पिल पात्यांचे जमिनीत पाणी भरण्याचे उपकरण (हेलिकल ब्लेड पडलर)
03
Jul

उंचावरील जमिनीची मशागत

• वळीव पावसाचा तसेच लवकर पडणार्यात मोसमी पावसाचा फायदा घेऊन शेत नांगरून माती मऊ व बारीक केली जाते • जमिनीचे पापुद्रे निघणे आणि ती टणक होण्याची समस्या असल्यास 1.0 टन/हे ह्याप्रमाणे जिप्समचा वापर करावा.
03
Jul

ii) दुसर्यां फेरीची मशागत:

दुसर्याज फेरीच्या मशागतीसाठी विशेष औजारे वापरून टणक ढेकळे फोडली जातात आणि मऊ, एकसारखी व पेरणीयोग्य जमीन तयार केली जाते. माती फोडणे व ती वरखाली हलवणे हा त्यामागील मुख्य हेतू असतो. ह्याशिवाय तीमध्ये खते मिसळली जातात व ती बियाण्यावर आवरणाच्या रूपाने वापरण्यायोग्य बनवली जाते. दुसर्याज फेरीच्या मशागतीसाठीची औजारे: 1. कल्टिव्हेटर 2. दंताळे (हॅरो) 3. टोकदार दंताळे 4. साखळीचे दंताळे 5. तबकडीचे दंताळे 6. आंतरमशागतीचे दंताळे
03
Jul

i). प्राथमिक मशागत

• प्राथमिक मशागत म्हणजे पिकाच्या काढणीनंतर किंवा मशागत न केलेली जमीन वरखाली करणे., • ह्यामध्ये, पुढील कामांसाठी, जमीन नांगरणे आणि ती वरखाली करण्याचाही समावेश होतो. • मशागतीचा मुख्य हेतू म्हणजे तणावर नियंत्रण आणणे, पहिल्या पिकाचे राहिलेले खुंट इ. जमिनीत मिसळणे आणि जमिनीचा एकंदर पोत पूर्वीसारखा करणे. • मशागतीची प्राथमिक औजारे: • देशी/ लाकडी/ स्थानिक नांगर- • सुधारित लोखंडी नांगर
03
Jul

मशागत

• मशागत म्हणजे विविध औजारे वापरून जमीन वरखाली करणे ज्यायोगे पेरलेल्या बियाण्याची उगवण चांगल्या प्रमाणात होऊन पिकाची वाढ जोमदार होईल. • हंगामातील मशागत: ही पीक घेण्याच्या काळात केली जाते (जून-जुलै) • बिगरहंगामी मशागत: ही जमीन मोकळी असताना किंवा पीक न लावण्याच्या काळात केली जाते ( उन्हाळ्यात)
03
Jul

जमीन तयार करणे

• जमीन तयार करण्यामध्ये साधारणतः नांगरणी, कुळवणी व सपाटीकरणाचा समावेश होतो ज्यायोगे तिच्यात पेरणी करता येते. • जमीन तयार करण्यासाठी बैलजोडी, दुचाकी ट्रॅक्टर किंवा चारचाकी ट्रॅक्टर ह्याचा वापर करता येईल. • जमिनीच्या प्राथमिक स्वरूपाच्या मशागतीसाठी रोटाव्हेटरचा वापर नांगराऐवजी करता येईल.
Copy rights | Disclaimer | RKMP Policies