Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

1. छोट्या अळ्या पानांच्या फक्त शिराच शिल्लक ठेवतात. परंतु नंतर त्यांची भूक वाढते आणि रात्रीच्या वेळी त्या पूर्ण पानेच फस्त करतात. 2. पूर्ण वाढीच्या अळ्यांना इन्स्टार म्हणतात. त्या गडद किंवा करड्या रंगाच्या असतात. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या भातखाचरातील रोपावर चढून ओंब्या देठातून तोडतात. 3. परिणामी रोपे गाईगुरांनी खाल्ल्यासारखी दिसू लागतात.
1. किडीचे नाव - आर्मी वर्म (लष्करी अळी) 2. शास्त्रीय नाव - मिथिमा सेपरेट 3. स्थानिक नाव - लष्करी अळी 4. किडीची वैशिष्ट्ये - जोराच्या पावसानंतर कोरडे दिवस आल्यास व हवा ढगाळ असल्यास तुरळकपणे आढळते 5. प्रादुर्भावाची तीव्रता - कमी ते मध्यम 6. पिकाच्या वाढीचे टप्पे - रोपटी, फुटवे तसेच पीक तयार झाल्यानंतरही.
हंगाम नसताना तसेच हंगामाच्या सुरुवातीस शेताभोवतीचे बंधारे तण काढून टाकून स्वच्छ ठेवणे
पिकावर धरळणी करणे - मेथिल पॅराथिऑन 2 टक्के किंवा मॅथिऑन 5 टक्के ही कीटकनाशके वापरून, 20 किग्रॅ/हे. ह्या प्रमाणात- 1 किडा /वरंबा (हिल) ईटीएल नुसार.
1. पांढरा दाणा भरतेवेळीच छोट्या तसेच पूर्ण वाढीच्या अळ्यांनी हल्ला केल्यामुळे ओंब्या पोकळ राहतात. परिणामी धान्याचे प्रमाण व दर्जा (तुटलेले दाणे येणे) दोन्ही घसरतात. 2. बाधित ओंब्यांमध्ये फोलपटांचे प्रमाण वाढते आणि त्यावर बाजूने तपकिरी ठिपका येतो.
1. किडीचे नाव - राइस इअर-हेड बग 2. शास्त्रीय नाव - लेप्टोकोरिझा ओरॅटोरिअस 3. स्थानिक नाव - ढेकण्या 4. किडीची वैशिष्ट्ये - अधूनमधून आढळते 5. प्रादुर्भावाची तीव्रता - गंभीर. 6. पिकाच्या वाढीचे टप्पे - दाणा पांढरा होण्याचे वेळी.
पिकावर 0.05 टक्के फेनिट्रोथिऑन किंवा 0.05 टक्के मॅलॅथिऑन किंवा 0.15 टक्के कार्बारिल फवारणे.
शेतात पाणी भरणे व त्यानंतर जमिनीवरून दोर ओढत नेऊन ते पाणी काढून टाकणे.
छोट्या अळ्या पानांच्या टोकाचे तुकडे काढतात व तेथे नळीसारख्या बोगद्यांमध्ये राहतात. ह्या नळ्या रोपाला जोडलेल्या असतात किंवा पाण्यावर तरंगताना आढळतात. अळ्या पाने व पानांमधले हरितद्रव्य खात असल्याने पानांवर शिडीसारखे दिसणारे पांढरे पट्टे दिसतात. एका पानाची वाट लावल्यानंतर ह्या अळ्या दुसर्या् चांगल्या पानाच्या सुरळीकडे वळतात. अळी पानातील उती संपूर्णपणे खाऊन टाकल्याने पाने पांढरट पातळ कागदासारखी बनतात. एखाद्या रोपावर बर्या.च अळ्यांनी एकाचवेळी हल्ला केल्यास त्या बहुतेक सर्व पानांची टोक, आपले घर बनवण्यासाठी, तोडतात.
1. किडीचे नाव - राइस केस वर्म 2. शास्त्रीय नाव - निंफुला डीपंक्टॅलिस 3. स्थानिक नाव - सुरळीतील अळी 4. किडीची वैशिष्ट्ये - पीक 1- 1.5 महिन्याचे झाल्यावर हल्ला करते 5. प्रादुर्भावाची तीव्रता - कमी ते मध्यम 6. पिकाच्या वाढीची स्थिती - फुटवे येण्याच्या सुरुवातीस
Copy rights | Disclaimer | RKMP Policies