Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

1). ट्रायकोग्रामा चिलोनिस 50,000 /हे. प्रमाणे दर आठवड्याला शेतात मिसळणे 2). शेतामध्ये ह्या अळ्यांच्या नैसर्गिक शत्रूंना जिवंत ठेवणे, उदा. मिरिड बग्ज, कोळी इ.
पिकावर 0.05 टक्के फेनिट्रोथिऑन किंवा 0.05 टक्के मॅलॅथिऑन किंवा 0.15 टक्के कार्बारिल फवारणे - प्रत्येकी 1- 2 गुंडाळलेली पाने / हिल ईटीएल नुसार.
शेतात पाणी भरणे व त्यानंतर जमिनीवरून दोर ओढत नेऊन ते पाणी काढून टाकणे.
1. अळ्या पानांच्या उती खातात आणि जसजशा त्या वाढू लागतात, त्या पानांची टोके एकत्र आणून ती गुंडाळतात. त्या ही टोके रेशमासारख्या धाग्यांनी एकत्र चिकटवतात आणि अशा प्रकारे तयार झालेल्या बोगद्यांमध्ये राहतात. 2. ह्या पानांमधील हरितद्रव्यावरच (क्लोरोफिल) जगत असल्याने पानांवर पहिल्यांदा लांब पांढरे पट्टे दिसतात व त्यानंतर पाने अर्धपारदर्शक होऊन जळाल्यासारखी दिसतात. 3. बाधित रोपे मरतुकडी दिसतात. पहिले पान येण्याचे वेळी (बूट लीफ स्टेज) ह्या अळीमुळे जास्त नुकसान होते.
1. किडीचे नाव - राइस लीफ फोल्डर 2. शास्त्रीय नाव - नॅफॅलोक्रोसिस मेडिनालिस 3. स्थानिक नाव - पाने गुंडाळणारी अळी 4. प्रादुर्भावाची तीव्रता - कमी 5. पिकाच्या वाढीचे टप्पे - पहिले पान येणे
तुडतुड्याला सहन करू शकणार्या जाती लावणे. उदा. आयईटी-7575, 7568, 1315,6314, 7943, सीओ-42 इ.
पिकावर 0.05 टक्के फेनिट्रोथिऑन किंवा 0.5 टक्के मॅलॅथिऑन किंवा 0.05 टक्के फेन्थोएट फवारणे किंवा कार्बारिल 10 टक्के @20किग्रॅ /हे धुरळणे, 5-10 hतुडतुडे/ हिल ईटीएल वर आधारित.
1. छोटे आणि प्रौढ किडे रोपाच्या महत्त्वाच्या भागातून रस शोषतात. तेथे अंडी घालतात, पानाच्या आवरणामधला किंवा मध्यभागातील शिरांतून रस शोषतात आणि तेथे काही विषारी द्रव्ये सोडतात. 2. ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे पाने अकाली पिवळी पडतात आणि मरू लागतात. अखेरीस ते पूर्ण रोपच मरते. 3. रोपे मरण्याची ही क्रिया एकमेकांपासून दूरदूर असलेल्या गोलाकार क्षेत्रांवर झालेली आढळते. अखेरीस ही सर्व क्षेत्रे एकत्र होऊन पूर्ण शेतच मरणार्यान रोपांनी भरून जाते. 4. रोपाच्या तळाशी कीटकांच्या विष्ठेचे मधाच्या रंगाचे व काजळीयुक्त लहान गोळे आढळतात. बाधित देठ मऊ पडतात आणि त्यांचा गवत म्हणूनही वापर करता येत नाही.
1. किडीचे नाव - ब्राउन प्लँटहॉपर 2. शास्त्रीय नाव - निल्पार्वता ल्युजेन्स 3. स्थानिक नाव - तुडतुडा 4. किडीची वैशिष्ट्ये - कधीकधीच आढळते 5. प्रादुर्भावाची तीव्रता - गंभीर 6. पिकाच्या वाढीचे टप्पे - फुलोरा आणि पुनरुत्पादनाच्या टप्प्यावर जास्तीतजास्त.
1). कीड सहन करू शकणार्या किंवा तिचा प्रतिकार करू शकणार्याG जाती लावणे. उदा. शक्ती, काकाटिया, सुरेखा, फाल्गुना, विक्रम, वैभव, स्मिता. टाटा इ.
Copy rights | Disclaimer | RKMP Policies