Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

Pests

Pests
25
ऑगस्ट

आर्मी वर्म (लष्करी अळी) ( Army worm (Lashkari Ali)

1. किडीचे नाव - आर्मी वर्म (लष्करी अळी)
2. शास्त्रीय नाव - मिथिमा सेपरेट
3. स्थानिक नाव - लष्करी अळी
4. किडीची वैशिष्ट्ये - जोराच्या पावसानंतर कोरडे दिवस आल्यास व हवा ढगाळ असल्यास तुरळकपणे आढळते
5. प्रादुर्भावाची तीव्रता - कमी ते मध्यम
6. पिकाच्या वाढीचे टप्पे - रोपटी, फुटवे तसेच पीक तयार झाल्यानंतरही.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
ऑगस्ट

राइस इअर-हेड बग (ढेकण्या) वर प्रतिबंधात्मक उपाय ( Preventive measures for Rice ear head bug( Dhekanya)

हंगाम नसताना तसेच हंगामाच्या सुरुवातीस शेताभोवतीचे बंधारे तण काढून टाकून स्वच्छ ठेवणे

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
ऑगस्ट

राइस इअर-हेड बग (ढेकण्या) च्या नियंत्रणाचे रासायनिक उपाय ( Chemical Control Measures for Rice ear head bug( Dhekanya)

पिकावर धरळणी करणे - मेथिल पॅराथिऑन 2 टक्के किंवा मॅथिऑन 5 टक्के ही कीटकनाशके वापरून, 20 किग्रॅ/हे. ह्या प्रमाणात- 1 किडा /वरंबा (हिल) ईटीएल नुसार.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
ऑगस्ट

राइस इअर-हेड बग (ढेकण्या) मुळे होणार्याो नुकसानीचे स्वरूप ( Nature of damage of Rice ear head bug( Dhekanya)

1. पांढरा दाणा भरतेवेळीच छोट्या तसेच पूर्ण वाढीच्या अळ्यांनी हल्ला केल्यामुळे ओंब्या पोकळ राहतात. परिणामी धान्याचे प्रमाण व दर्जा (तुटलेले दाणे येणे) दोन्ही घसरतात.

2. बाधित ओंब्यांमध्ये फोलपटांचे प्रमाण वाढते आणि त्यावर बाजूने तपकिरी ठिपका येतो.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
ऑगस्ट

राइस इअर-हेड बग (ढेकण्या) ( Rice ear head bug( Dhekanya)

1. किडीचे नाव - राइस इअर-हेड बग
2. शास्त्रीय नाव - लेप्टोकोरिझा ओरॅटोरिअस
3. स्थानिक नाव - ढेकण्या
4. किडीची वैशिष्ट्ये - अधूनमधून आढळते
5. प्रादुर्भावाची तीव्रता - गंभीर.
6. पिकाच्या वाढीचे टप्पे - दाणा पांढरा होण्याचे वेळी.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
ऑगस्ट

राइस केस वर्म ( सुरळीतील अळी ) च्या नियंत्रणाचे मानवी उपाय (Chemical Control Measures for Rice case- worm ( Surlitil Ali )

पिकावर 0.05 टक्के फेनिट्रोथिऑन किंवा 0.05 टक्के मॅलॅथिऑन किंवा 0.15 टक्के कार्बारिल फवारणे.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
ऑगस्ट

राइस केस वर्म ( सुरळीतील अळी ) च्या नियंत्रणाचे मानवी उपाय ( Manual Control Measures for Rice case- worm ( Surlitil Ali )

शेतात पाणी भरणे व त्यानंतर जमिनीवरून दोर ओढत नेऊन ते पाणी काढून टाकणे.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
ऑगस्ट

राइस केस वर्म ( सुरळीतील अळी )मुळे होणार्या् नुकसानीचे स्वरूप (Nature of damage of Rice case- worm ( Surlitil Ali )

छोट्या अळ्या पानांच्या टोकाचे तुकडे काढतात व तेथे नळीसारख्या बोगद्यांमध्ये राहतात. ह्या नळ्या रोपाला जोडलेल्या असतात किंवा पाण्यावर तरंगताना आढळतात. अळ्या पाने व पानांमधले हरितद्रव्य खात असल्याने पानांवर शिडीसारखे दिसणारे पांढरे पट्टे दिसतात. एका पानाची वाट लावल्यानंतर ह्या अळ्या दुसर्या् चांगल्या पानाच्या सुरळीकडे वळतात. अळी पानातील उती संपूर्णपणे खाऊन टाकल्याने पाने पांढरट पातळ कागदासारखी बनतात. एखाद्या रोपावर बर्या.च अळ्यांनी एकाचवेळी हल्ला केल्यास त्या बहुतेक सर्व पानांची टोक, आपले घर बनवण्यासाठी, तोडतात.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
ऑगस्ट

राइस केस वर्म ( सुरळीतील अळी ) ( Rice case- worm ( Surlitil Ali )

1. किडीचे नाव - राइस केस वर्म
2. शास्त्रीय नाव - निंफुला डीपंक्टॅलिस
3. स्थानिक नाव - सुरळीतील अळी
4. किडीची वैशिष्ट्ये - पीक 1- 1.5 महिन्याचे झाल्यावर हल्ला करते
5. प्रादुर्भावाची तीव्रता - कमी ते मध्यम
6. पिकाच्या वाढीची स्थिती - फुटवे येण्याच्या सुरुवातीस

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
25
ऑगस्ट

राइस लीफ फोल्डर ( पाने गुंडाळणारी अळी) च्या नियंत्रणाचे जैविक उपाय ( Biological Control Measures for Rice leaf folder ( Pane Gundalnari Ali )

1). ट्रायकोग्रामा चिलोनिस 50,000 /हे. प्रमाणे दर आठवड्याला शेतात मिसळणे

2). शेतामध्ये ह्या अळ्यांच्या नैसर्गिक शत्रूंना जिवंत ठेवणे, उदा. मिरिड बग्ज, कोळी इ.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
ऑगस्ट

राइस लीफ फोल्डर ( पाने गुंडाळणारी अळी) च्या नियंत्रणाचे रासायनिक उपाय ( Chemical Control Measures for Rice leaf folder ( Pane Gundalnari Ali )

पिकावर 0.05 टक्के फेनिट्रोथिऑन किंवा 0.05 टक्के मॅलॅथिऑन किंवा 0.15 टक्के कार्बारिल फवारणे - प्रत्येकी 1- 2 गुंडाळलेली पाने / हिल ईटीएल नुसार.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
ऑगस्ट

राइस लीफ फोल्डर ( पाने गुंडाळणारी अळी) च्या नियंत्रणासाठी मानवी उपाय ( Manual Control Measures for Rice leaf folder ( Pane Gundalnari Ali )

शेतात पाणी भरणे व त्यानंतर जमिनीवरून दोर ओढत नेऊन ते पाणी काढून टाकणे.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
ऑगस्ट

राइस लीफ फोल्डर ( पाने गुंडाळणारी अळी) मुळे होणार्याr नुकसानीचे स्वरूप ( Nature of damage for Rice leaf folder ( Pane Gundalnari Ali )

1. अळ्या पानांच्या उती खातात आणि जसजशा त्या वाढू लागतात, त्या पानांची टोके एकत्र आणून ती गुंडाळतात. त्या ही टोके रेशमासारख्या धाग्यांनी एकत्र चिकटवतात आणि अशा प्रकारे तयार झालेल्या बोगद्यांमध्ये राहतात.

2. ह्या पानांमधील हरितद्रव्यावरच (क्लोरोफिल) जगत असल्याने पानांवर पहिल्यांदा लांब पांढरे पट्टे दिसतात व त्यानंतर पाने अर्धपारदर्शक होऊन जळाल्यासारखी दिसतात.

3. बाधित रोपे मरतुकडी दिसतात. पहिले पान येण्याचे वेळी (बूट लीफ स्टेज) ह्या अळीमुळे जास्त नुकसान होते.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
ऑगस्ट

राइस लीफ फोल्डर ( पाने गुंडाळणारी अळी) ( Rice leaf folder ( Pane Gundalnari Ali )

1. किडीचे नाव - राइस लीफ फोल्डर
2. शास्त्रीय नाव - नॅफॅलोक्रोसिस मेडिनालिस
3. स्थानिक नाव - पाने गुंडाळणारी अळी
4. प्रादुर्भावाची तीव्रता - कमी
5. पिकाच्या वाढीचे टप्पे - पहिले पान येणे

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
ऑगस्ट

ब्राउन प्लँटहॉपर (तुडतुडा) च्या नियंत्रणाचे जैविक उपाय ( Biological Control Measures of Brown planthopper (Tudtuda)

तुडतुड्याला सहन करू शकणार्या जाती लावणे. उदा. आयईटी-7575, 7568, 1315,6314, 7943, सीओ-42 इ.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
ऑगस्ट

ब्राउन प्लँटहॉपर (तुडतुडा) च्या नियंत्रणासाठी रासायनिक उपाय ( Chemical Control Measures for Brown planthopper (Tudtuda)

पिकावर 0.05 टक्के फेनिट्रोथिऑन किंवा 0.5 टक्के मॅलॅथिऑन किंवा 0.05 टक्के फेन्थोएट फवारणे किंवा कार्बारिल 10 टक्के @20किग्रॅ /हे धुरळणे, 5-10 hतुडतुडे/ हिल ईटीएल वर आधारित.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
ऑगस्ट

ब्राउन प्लँटहॉपर (तुडतुडा) मुळे होणार्याि नुकसानीचे स्वरूप ( Nature of damage for Brown planthopper (Tudtuda)

1. छोटे आणि प्रौढ किडे रोपाच्या महत्त्वाच्या भागातून रस शोषतात. तेथे अंडी घालतात, पानाच्या आवरणामधला किंवा मध्यभागातील शिरांतून रस शोषतात आणि तेथे काही विषारी द्रव्ये सोडतात.

2. ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे पाने अकाली पिवळी पडतात आणि मरू लागतात. अखेरीस ते पूर्ण रोपच मरते.

3. रोपे मरण्याची ही क्रिया एकमेकांपासून दूरदूर असलेल्या गोलाकार क्षेत्रांवर झालेली आढळते. अखेरीस ही सर्व क्षेत्रे एकत्र होऊन पूर्ण शेतच मरणार्यान रोपांनी भरून जाते.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
ऑगस्ट

ब्राउन प्लँटहॉपर (तुडतुडा) ( Brown planthopper (Tudtuda)

1. किडीचे नाव - ब्राउन प्लँटहॉपर
2. शास्त्रीय नाव - निल्पार्वता ल्युजेन्स
3. स्थानिक नाव - तुडतुडा
4. किडीची वैशिष्ट्ये - कधीकधीच आढळते
5. प्रादुर्भावाची तीव्रता - गंभीर
6. पिकाच्या वाढीचे टप्पे - फुलोरा आणि पुनरुत्पादनाच्या टप्प्यावर जास्तीतजास्त.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
ऑगस्ट

गॉल मिज ( नळ आणि गड माशी ) च्या नियंत्रणासाठी जैविक उपाय ( Biological Control Measures for Gall midge ( Nal and Gad mashi )

1). कीड सहन करू शकणार्या किंवा तिचा प्रतिकार करू शकणार्याG जाती लावणे. उदा. शक्ती, काकाटिया, सुरेखा, फाल्गुना, विक्रम, वैभव, स्मिता. टाटा इ.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
ऑगस्ट

गॉल मिज ( नळ आणि गड माशी ) च्या नियंत्रणासाठी रासायनिक उपाय Chemical Control Measures for Gall midge ( Nal and Gad mashi )

फोरेट 10ग्रॅम @ 10 किग्रॅ किंवा क्विनाल्फॉस 5ग्रॅम @ 15 किग्रॅ किंवा इथोप्रोफोस 5 ग्रॅम @ 15 किग्रॅ/हे. ह्या प्रमाणात, पुनर्लावणीनंतर 10 व 30 दिवसांनी, मातीतून देणे. 5 टक्के सिल्व्हर शूट्स /चौ.मी ईटीएल वर आधारित.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
Syndicate content
Copy rights | Disclaimer | RKMP Policies